समुद्रपूर: मांडगाव शिवारात अवैध वाळू वाहून नेणारे तिन टिप्पर जप्त: महसूल विभागाची धडक कारवाई
मांडगाव शिवारात महसूल विभागाच्या पथकाने उपविभागीय अधिकारी शिल्पाताई सोनाले यांच्या मार्गदर्शनात अवैध वाळू वाहून नेणाऱ्या तिन टिप्परला ताब्यात घेऊन कारवाई केली आहे. माहितीनुसार २५ मे रात्री २ वाजता महसूल विभागाचे पथक अवैध वाळू विरोधात रात्रकालीन पेट्रोलिंग करीत असताना मांडगाव शिवारात रस्त्यावर टिप्पर क्रमांक एम एच ३६ - १६३२ चालक अनिल कोराटे राहणार बोरगाव मेघे ,टिप्पर क्रमांक एम एच २७ बिएक्स ७५५८ चालक गजू मसराम ,टिप्पर क्रमांक एम एच ३१- ६४४२ चालक रविंद्र सुरजुसे अवैध वाळू वाहतूक करीत होत