जालना जिल्ह्यातील अंबड, परतूर आणि भोकरदन या तीनही नगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, या निकालांनी जिल्ह्यातील राजकीय समीकरणे स्पष्ट केली आहेत. रविवार दि. 21 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वाजता मिळालेल्या माहितीनुसार अंबड आणि परतूर येथे भारतीय जनता पक्षाने सत्ता मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले असून, भोकरदन नगरपरिषदेत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या तुतारीने ऐतिहासिक विजय मिळवत काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.