हिंगणघाट येथे भाजपाच्या वतीने तुळसकर सभागृहात आयोजित नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार सोहळा तसेच पदवीधर मतदार नोंदणी मेळावा अत्यंत उत्साहपूर्ण आणि संघटनात्मक वातावरणात पार पडला लोकशाही प्रक्रियेत जनतेचा विश्वास संपादन करून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचा सन्मान आणि मतदार नोंदणीसारख्या महत्त्वाच्या उपक्रमाची जोड वैशिष्ट्य ठरली.हा मेळावा म्हणजे विजयाचा गौरव, कर्तव्याची जाणीव आणि पुढील वाटचालीचा संकल्प असा त्रिसूत्री संदेश देणारा ठरला असे मत आमदार कुणावार यांनी व्यक्त केले.