समुद्रपूर: परडा शिवारात दुचाकीला कारची धडक : दुचाकी चालक जागीच ठार : सहकारी गंभीर जखमी
समुद्रपूर तालुक्यातील नागपूर - चंद्रपूर महामार्गवरील जाम येथून परडा गावात जातं असलेल्या दुचाकीला समोरासमोर होंडाई कारने धडक दिली. या धडकेत दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला.ही घटना 3 जुलै सायंकाळी 4.30 वाजताच्या सुमारात घडली.मृतक व्यक्तीचे आकाश गणपत जोगवे वय : 35 वर्ष असे नाव आहे. तर सहकारी धीरज धनराज चांदेकर वय 20 वर्ष दोन्ही राहणार मंगरूळ याचा समावेश आहे. आकाश महेंद्र फाईनस या कंपनीत कामावर असल्याने तो त्यांच्या मित्रा सोबत कार्यालयीन कामासाठी परडा येथे दुचाकीने जात असताना अपघात झाला