साकोली येथील परेड ग्राऊंडवरील सरस्वती वाचनालयात बुधवार दि.17 डिसेंबरला सायंकाळी5 वाजता प्रहार अपंग क्रांती आंदोलनाच्या शाखा साकोलीतर्फे तालुक्यातील दिव्यांगांसाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते.या सभेमध्ये कार्यकारिणीची निवड करण्यात आली तालुका अध्यक्षपदी कृष्णा बावनकुळे,तालुका सचिवपदी भगवान लांजेवार व शहरअध्यक्षपदी खुशाल कापगते यांची निवड करण्यात आली ही संघटना दिव्यांगांना न्याय मिळवून देण्यासाठी काम करणार आहे