कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी व नाचनवेल जिल्हा परिषद सर्कलमध्ये एकाच गावातील दोन-दोन उमेदवार उभे राहिल्याने मतदार संभ्रमात सापडले आहेत. ही माहिती आज दि १८ जानेवारी रोजी दुपारी चार वाजता सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी व्यक्त केलेले मत असलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उमेदवारांची संख्या वाढल्याने मतांचे विभाजन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीचा निवडणूक निकालावर परिणाम होण्याची चर्चा सुरू आहे.