अंबरनाथ: बदलापूर येथे अजित पवार गटाकडून मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप
सध्या राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. अशातच आज दिनांक 27 नोव्हेंबर रोजी दुपारी 12च्या सुमारास बदलापूर येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अजित पवार गटाकडून पैसे वाटल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. बदलापूर येथील प्रभाग क्रमांक 1 मध्ये अजित पवार गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी पैसे वाटल्याचा आरोप शिंदे गटाकडून करण्यात आला असून पैसे वाटणाऱ्या महिलांना रंगेहात पकडण्यात आल आहे.