कन्नड शहराच्या उपनगराध्यक्षपदी आंबेडकरी तरुणाची निवड होईल, अशी अपेक्षा होती.मात्र अखेरीस राजकीय पक्षांचा निर्णय अंतिम ठरला.या निर्णयामुळे आंबेडकरी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसून येत आहे.सामाजिक कार्यकर्ते तातेराव भुजंग यांनी याबाबत आज दि १४ जानेवारी रोजी सांयकाळी सात वाजता खंत व्यक्त केली.न्याय व प्रतिनिधित्वाची संधी हुकल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली.सदरील व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.