औसा: टाका येथे दुचाकीची चोरी ; भादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Ausa, Latur | Mar 14, 2024 टाका येथे पाहुण्याच्या घरासमोर पार्किंग केलेल्या एमएच १३ - झेड ३४८४ या क्रमांकाच्या दुचाकीची चोरी झाल्याची घटना १४ मार्च रोजी घडली. जुन्या वापरातील ६० हजार रुपये किमतीही ही दुचाकी आहे. घरासमोर पार्किंग केल्यानंतर चोरट्यांनी दुचाकी लंपास केली, असे भगवान भीमाशंकर इंगळे (रा. सुलेर, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले. त्यानुसार भादा पोलिसात गुन्हा नोंद आहे.