तालुक्यातील शिरसोदे शिवारात तिसगाव ता. जि. धुळे येथील राहिवासी तथा हल्ली मुक्काम शिरसोदे शिवारातील विलास हिंमतराव पाटील रा शिरसोदे यांचे शेतात मेंढपाळ उतरलेले असतांना त्यांच्यातील 15 वर्षीय बालक हा विहिरीवर पाणी पिण्यासाठी गेला असता पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज दिनांक 11 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली.