माजलगाव: डी वाय एफ आय चे तेरावे राज्य अधिवेशन आजपासून माजलगाव येथे सुरू करण्यात आले आहे
माजलगाव शहरात आजपासून डीवायएफआय (Democratic Youth Federation of India) चे १३वे महाराष्ट्र राज्य अधिवेशन भव्यदिव्य वातावरणात सुरू झाले आहे. १९, २० आणि २१ नोव्हेंबर २०२५ या तीन दिवसांत पार पडणाऱ्या या अधिवेशनात राज्यभरातून आलेले युवक प्रतिनिधी, पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. अधिवेशनाच्या उद्घाटनावेळी विविध मान्यवरांनी “समानतेसाठी संघर्ष आणि संघटित होण्याची गरज” या अधिवेशनाच्या मुख्य घोषणेवर भर दिला.