यवतमाळ: निवडणुकीदरम्यान कुठेही गैरप्रकार घडता कामा नये ; जिल्हाधिकारी विकास मीना
यवतमाळ जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने दि. 2 डिसेंबर रोजी मतदान व दि. 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या अनुषंगाने मतदान केंद्राच्या ठिकाणी पुरेसे मनुष्यबळ व आवश्यक बाबींची पूर्तता व्हावी. निवडणूक सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने निवडणूक आयोगाच्या आदेशांचे काटेकोर पालन व्हावे. कुठेही गैरप्रकार घडता कामा नये, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले.