ग्रामीण भागात असलेल्या राहडी शेतशिवारात वाघाने गायीची शिकार केल्याची घटना घडली. याबाबत चे वृत्त असे की मोरेश्वर झाडबा बावणे यांनी चाराईसाठी गाय राहडी शेतशिवारात सोडली होती. वाघाने अचानक गायीवर हल्ला करून शिकार केली. त्यावरून घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यावरून वनविभाग कर्मचारी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला. नुकसान ग्रस्तास भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.