साकोली नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या मोहघाटा येथे अवैधरीत्या विनापरवाना रेतीची चोरी करून वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालक प्रशांत चेटूले व ट्रक्टर मालक रामेश्वर निंबार्ते या दोघांवर शुक्रवार दि.19डिसेंबरला सायंकाळी सहा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोघांकडून ट्रॅक्टर ट्रॉली व एक ब्रास रेती असा एकूण सात लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही कारवाई नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा भंडाऱ्याचे विजय राऊत यांनी केली आहे