दारव्हा तालुक्यातील वडगाव गाढवे येथे जुन्या भांडणाच्या रागातून सात जणांनी मिळून एका कुटुंबावर प्राणघातक हल्ला केल्याची गंभीर घटना घडली. ही घटना ८ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली असून १० डिसेंबर रोजी दुपारी १२.३९ वाजता लाडखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.