पाथरी तालुक्यातील रेनाखळी शिवारात बिबट्याचा वाढता वावर पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. दोन गायींचा फडशा पाडल्यानंतर वन विभागाने लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यात हा बिबट्या शेतकरी प्रमोद हरकळ यांच्या शेतात बिबट्या ची प्रतिमा कैद झाल्याचे समोर आले आहे. बिबट्याचा वाढता वावर लक्षात घेता वनविभागाने तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.