रामटेक: कही खुशी, तो कही गम चा माहोल, शिवसेनेचा जल्लोष ; तर विजयी उमेदवारांची रामटेक नगरीत विजयी मिरवणूक
न.प. रामटेकच्या निवडणूक संदर्भात रवि. दि. 21 डिसेंबरला घोषित निकालानंतर कही खुशी तो कही गमचा माहोल होता. दुपारी 2 वाजता पर्यंत सर्व निकाल हाती आले.यात शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बीकेंद्र महाजन यांनी बाजी मारली.सकाळी 10 वाजता न.प. कार्यालय रामटेक येथे मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात पहिल्या पाच प्रभागाचे 10 उमेदवार विजयी घोषित करण्यात आले. यासोबतच बाहेर उभे असलेल्या पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते,समर्थकांनी एकच जल्लोष केला. संदल,डीजे वाजविण्यात आला. मिरवणूक काढण्यात आली.