खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा असलेल्या गुन्हेगाराला पिस्टल बाळगल्याप्रकरणी वारजे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतुस असा ४० हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला आहे. सागर अनिल मुंडे असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.