आमगाव तालुक्यातील ग्राम घाट्टेमणी येथील कृष्णकुमार राधेश्याम दोनोडे (३५) यांच्या घरासमोर अंगणात ठेवलेली ट्रॅक्टरची ट्राॅली ३१ डिसेंबर २०२५ ते ०१ जानेवारी २०२६ दरम्यान रात्री चोरीला गेली होती. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दोघा चोरट्यांना अटक केली असून, त्यांच्याकडून चोरलेली ट्रॉली जप्त करण्यात आली आहे.