जाफराबाद: माहोरा,टेंभुर्णी , वरूड यासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरू,वन विभागाने लक्ष देण्याची वृक्षप्रेमींची मागणी
आज दिनांक 1 डिसेंबर २०२५ वार सोमवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास या प्रभात तालुक्यातील माहुरा ,टेंभुर्णी, वरुड या संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड केली असल्याचे पाहायला मिळाले आहे यात लिंब ,बाभूळ, चिंच यासारख्या हिरवेगार झाडे तोडून बाजारात विकली जाऊ लागली आहे ,त्यामुळे याकडे जालना वन विभागाने वेळीच लक्ष देऊन होणारी वृक्षतोड थांबवावी अशी मागणी सध्या या जाफराबाद तालुक्यातील वृक्षप्रेमी वन विभागाकडे करत आहे.