छत्रपती संभाजीनगर-जवाहर नगर पोलीस स्टेशन हद्दीतील सूतगिरि चौकामध्ये मित्राची वाट बघत उभे असलेल्या व्यक्तीचा मोबाईल हिसकावला.दुचाकीवर आलेल्या दोघांनी मोबाईल हिसकावून पळ काढला याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावरून पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या असल्याची माहिती सह पोलीस निरीक्षक अतिश लोहकरे यांनी दिली.