एका अनोळखी तरुणाचा मृतदेह प्रभार घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने शहरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. ही घटना यवतमाळ शहरातील रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या शासकीय गोदाम परिसराच्या मागे 23 डिसेंबरला उघडकीस आली. या घटनेने यवतमाळ शहरात एकच खळबळ उडाली असून या तरुणाची आत्महत्या आहे की घातपात याबाबत विविध चर्चेला उधान आले आहे.अवधूतवाडी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून मृतदेह शासकीय दवाखान्यात दाखल केला.