नांदगाव खंडेश्वर: नगराध्यक्ष पदभार स्वीकारण्याआधी ॲक्शन मोडवर,नगरपंचायतीची झाडाझडती,डम्पिंग ग्राऊंड, जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी
नवनिर्वाचित नगराध्यक्ष सौ प्राप्ति मारोटकर व नगरसेवकांनी पदभार स्वीकारण्या आधीच ॲक्शन मोडवर नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत कार्यालयात आज ३० डिसेंबर मंगळवार रोजी सकाळी १० वाजताच झाडाझडती घेऊन विनापरवानगी गैरहजर कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन विना पगारी करण्याचे निर्देश नगराध्यक्षांनी दिले त्यामुळे नगरपंचायत कर्मचाऱ्यांत धास्ती निर्माण झाली आहे. नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्राप्ती मारोटकर यांनी नगरपंचायत कार्यालयात सकाळी अचानक धडक देऊन कार्यालयाची पाहणी केली यावेळी मुख्याधिकारी सुट्टीवर...