नप रामटेकच्या नुकत्याच संपन्न निवडणुकीत शिवसेनेनंतर दुसऱ्या क्रमांकावर यशस्वी ठरलेल्या काँग्रेसने विरोधी पक्ष नेता तसेच पक्षाच्या गटनेतेपदी युवा नगरसेवक अभिषेक डहारे यांची नियुक्ती केली आहे. बुधवार दि. 7 जानेवारीला दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर येथे जाऊन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे प्रतिज्ञापत्र सादर केल्याची माहिती नगरसेवक अभिषेक डहारे यांनी गुरुवार दि. ८ जानेवारीला दुपारी दोन वाजताच्या दरम्यान दिली. यावेळी काँग्रेसचे सर्व 7 नगरसेवक उपस्थित होते.