नांदुरा: अंगावर कोणत्याही प्रकारचा चट्टा असल्यास तपासून घ्यावे;१७ नोव्हेंबर ते २ डिसेंबर कुष्ठरोग शोध मोहिम –डॉ अमोल गीते जि.आ.अ
बुलढाणा जिल्ह्यात 17 नोव्हेंबर ते दोन डिसेंबर दरम्यान कुष्ठरोग शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत सर्व जनतेने अंगावर कोणत्याही प्रकारचा चट्टा असल्यास डॉक्टरांकडून तपासणी करावी असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गीते यांनी केले आहे.