साकोली तालुक्यातील पाथरी येथील विजय बोरकर यांच्या पन्नास हजार रुपये किमतीच्या म्हशीवर मंगळवार दि 23 डिसेंबरला दुपारी 4 वाजता हल्ला करून या म्हशीला जखमी केले बुधवार दि24 ला पहाटे सहा वाजता ही बाब विजय बोरकर यांच्या लक्षात आली ही माहिती वनविभागाला कळविण्यात आली आहे दिवसाढवळ्याच बिबट्याने म्हशीवर हल्ला केल्याने गोपालकांमध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकरी व गोपालकांकडून केली जात आहे