अंबरनाथ: बदलापूर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सभेची जय्यत तयारी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज होऊ घातलेल्या सभेसाठी बदलापूर शहरात सध्या जय्यत तयारी सुरू आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या आगमनामुळे शहर आणि परिसरातील शिंदेंच्या शिवसैनिकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला असून, सभेचे ठिकाण भव्य व्यासपीठाने सजवण्यात येत आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या सभेसाठी केवळ बदलापूरच नाही, तर अंबरनाथ आणि आसपासच्या भागातूनही नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहतील असा आयोजकांना विश्वास आहे.