पैठण शहरात शिवसेना शिंदे गटाचा नगराध्यक्ष विजयी पैठण शहरात शिवसेना शिंदे गटाचे विद्या भूषण कावसानकर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले आहे त्यांना 12500 मते मिळाली आहे ते 3711 मतांनी विजयी झाले आहे दरम्यान पैठण शहरात पुन्हा एकदा भूमरे गटाचे वर्चस्व सिद्ध झाले आहे विजयी झाल्यानंतर भूमरे समर्थकांनी गुलाल उधळत विजय जल्लोष साजरा केला विजयानंतर हा विजय जनतेचा असून जनतेने आम्हाला संधी दिली त्याबद्दल खासदार संदिपान भुमरे व आमदार विलास भुमरे यांनी सर्वांचे आभार मानले