ग्रामीण भागात असलेल्या चीचघाट पुनर्वसन शेतशिवारात वाघाने 2 वासरांची शिकार केल्याची घटना घडली. याबाबत चे वृत्त असे की शेतकरी देवराव धणजोडे यांनी आपली जनावरे शेतात नेली होती. शेतात जनावरे चारा खात असतांना वाघाने अचानक हल्ला करून 2 वासरांची शिकार केली. शेतकरी शेतात गेले असता 2 वासरांची शिकार झाल्याचे दिसून आले. त्यावरून घटनेची माहिती वन अधिकारी यांना देण्यात आली .त्यावरून वन अधिकारी यांनी पंचनामा केला केला.