कुडाळ: गोपिचंद पडळकर यांचा सिंधुदुर्ग जिल्हा शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे निषेध
राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर जात टीका केल्यामुळे भाजपचे गोपीचंद पडळकर यांचा महाराष्ट्रात निषेध केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शरद पवार गट सिंधुदुर्गतर्फे त्यांचा जाहीर निषेध कुडाळ येथे करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.