तळेगाव येथील जुन्या वस्ती परिसरात राहणाऱ्या युवकांने महिलेवर प्राण घातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना दिनांक 14 ला सकाळी दहाच्या सुमारास घडली या प्रकरणी रात्री साडेआठ वाजता या घटनेची नोंद तळेगाव पोलिसांनी केली तळेगाव पोलिसांनी अभय राणोटकर वय वीस वर्ष याला आर्वी येथून अटक केली तर जखमी महिला कुसुम ठाकरे वय ५७ तळेगाव वार्ड नंबर तीन यांच्यावर पहिले आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात आणि नंतर अमरावती येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी आज दिली