खेड तालुक्यातील कुरुळी-चिंचोळी परिसरात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. कुत्र्याला दगड मारल्याच्या कारणावरून दोन तरुणांनी एकावर जीवघेणा हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आळंदी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.