पाचोरा: समता सैनिक दलाचे तहसील आवारात विविध मागण्यासाठी बेमुदत धरणे व आमरण उपोषण सुरू,
समता सैनिक दल पाचोरा शाखेतर्फे पाचोरा तहसील आवारात बेमुदत धरणे उपोषण सुरू असून आज दिनांक 7 ऑक्टोंबर 2025 रोजी धरणे उपोषणाचा दुसरा दिवस, उलटला तरीही पाचोरा तहसीलदार हे उपोषणकर्त्यांची भेट घेण्यास आंदोलन स्थळावर न आल्याने धरणे आंदोलनाचे रूपांतर हे आमरण उपोषणात करण्यात येऊन आज पासून आमरण उपोषणास सुरुवात झाली, समाजाच्या विविध मागण्यांसाठी हे उपोषण सुरू असून पाचोरा तहसीलदार विजय बनसोडे हे अद्यापही उपोषणस्थळी मागण्या ऐकण्यासाठी व त्यावर तोडगा काढण्यासाठी पोहोचलेच नाही,