"राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो, याची प्रचिती पुन्हा एकदा वर्ध्यात आली आहे. निवडणूक प्रचारात एकमेकांवर तुटून पडणारे नेते आता सत्तेसाठी एकाच पंगतीत बसले आहेत. वर्धा नगरपालिकेत भाजप आणि अजित पवार गट आता हातात हात घालून चालणार असल्याचं स्पष्ट झालं असून, तसं अधिकृत पत्रच जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं आहे."