शहरातील गजबजलेल्या काटोल नाका चौकात आज दुपारी एका चालत्या मोपेडला अचानक भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित दुचाकीस्वार काटोल नाका चौकातून जात असताना अचानक गाडीच्या इंजिनमधून धूर निघू लागला. क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण मोपेड आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.