घाटंजी: शहरातील वाजपेयी लेआउट परिसरातून अज्ञाताने केली दुचाकी लंपास,घाटंजी पोलिसात गुन्हा दाखल
फिर्यादी सागर श्रीराम ठाकरे यांच्या तक्रारीनुसार कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीची दहा हजार रुपये किमतीची एम एच २९ एन ५३७९ या क्रमांकाची दुचाकी चोरून नेली.याप्रकरणी 24 नोव्हेंबरला रात्री अंदाजे साडेदहा वाजता च्या सुमारास घाटंजी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.