भाकपच्या वतीने दुर्गा मंदिर येथे कॉ.सोमाजी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली सभेचे आयोजन करण्यात आले होते. एवढी प्रमुख मार्गदर्शक कॉ.हौसलाल रंहागडाले कॉ.गुणवंतराव नाईक यांनी मार्गदर्शन करताना मनरेगाचे नाव बदलून जी रामजी केले. यामुळे देशात महात्मा गांधी यांचा अपमानासह देशातील श्रमिकांचा अपमान केला आहे. याच्या निषेध भाकप च्या वतीने करण्यात आला. 26 डिसेंबरला भाकपला शंभर वर्ष पूर्ण होत असल्याने झेंडावंदन करून 27 डिसेंबरला महात्मा गांधी यांच्या स्मारकाजवळ रॅली काढण्यात येईल. असे सभेत ठरले.