जिंतूर शहरातील मिस्किन कॉलनी मधील एका घरात शासनाने प्रतिबंधित केलेला अवैध गुटखा असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलिसांच्या पथकाने सदर ठिकाणी छापा मारून अवैध गुटख्याचा 57860 रुपयांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आल्याची कारवाई सोमवार 8 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता करण्यात आली. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक विजय जाधव यांच्या फिर्यादीवरून जिंतूर पोलीसात सोमवार 8 डिसेंबर रोजी रात्री साडेनऊ वाजता गुन्हा दाखल.