जालना शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आणि पाण्याची नासाडी रोखण्यासाठी जालना शहर महानगरपालिका यांच्याकडून संत गाडगेबाबा जलाशय (घाणेवाडी) ते जलशुद्धीकरण केंद्र दरम्यानच्या मुख्य पाणीपुरवठा वाहिनीवरील गळती दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. रविवार दि. 4 जानेवारी 2025 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार या कामामुळे सोमवार, दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी सकाळी संबंधित पाणीपुरवठा वाहिनी बंद ठेवण्यात येणार असून, नवीन जालना विभागातील पाणीपुरवठा 2 दिवस विस्कळीत होणार.