एक खासदार दोन आमदार असलेल्या आर्वी नगरपालिका कडे वर्धा जिल्ह्याचे लक्ष केंद्रित झाले होते .. हमसे बढकर कौन? अशी परिस्थिती निर्माण झाली होती मात्र मागील निवडणुकीत एक हाती सत्ता असलेल्या नगरपालिकेला याप्रसंगी जाणता मतदारांनी समिश्र कौल दिला आर्वी नगरपालिकेत 12 प्रभागातील पंचवीस वार्डातून 25 उमेदवार निवडून द्यायचे होते त्यापैकी राष्ट्रवादी शप 07, भाजप 14, काँग्रेस 02, राष्ट्रवादीअप एक, उबाठा एक असे मतदारांनी कौल देऊन भाजपच्या स्वाती गुल्हाने यांना नगराध्यक्ष पदावर आज विराजमान केले..