ग्रामीण भागात असलेल्या डाहीडी शेतशिवारात वाघाने अचानक हल्ला करून 3 गोऱ्याची शीकार केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत चे वृत्त असे की लक्षमन महादेव गवळी यांची जनावरे शेतशिवारात चारा खात असतांना अचानक वाघाने हल्ला करून 3 गोऱ्याची शिकार केली. गोपालक शेतीवर गेले असता 3 गोरे मृत अवस्थेत आढळुन आले. त्यावरून चौकशी केली असता वाघाने शिकार केल्याचे दिसून आले त्यावरून घटनेची माहिती वनविभाग ब पोलीस स्टेशन ला देण्यात आली.