हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेल्या औंढा नागनाथ येथील हिंगोली रोड लगतच्या हजरत सय्यद अब्दुल लतीफशहा बाबाचा उर्फ मोठ्या उत्साहाने साजरा होत असून या निमित्त दिनांक 13 नोव्हेंबर गुरुवार रोजी सायंकाळी साडेचार वाजता शहराच्या प्रमुख मार्गाने भव्य संदल मिरवणूक काढण्यात आली होती यामध्ये उंट घोड्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पोलीस निरीक्षक जीएस राहिरे सह पोलीसानी बंदोबस्त ठेवला होता दरम्यान दर्गा परिसरातही हिंदू मुस्लिम महिलांसह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.