विक्टीम शेल्टर संघटनेतर्फे हजरत शहेनशहावली दर्गाह परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली
Beed, Beed | Nov 19, 2025 ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्व असलेल्या हज़रत शहींशाह वली दर्गाह कब्रस्तान परिसरात आजपासून (दि. 19 नोव्हेंबर) मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीमेची सुरुवात करण्यात आली. ही मोहीम विक्टीम शेल्टर संघटनेच्या वतीने अध्यक्ष मोमीन अखिल यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे. कबरस्तान परिसरात वाढलेली काटेरी झुडपे, कचरा आणि अडथळे दूर करून परिसर स्वच्छ, सुव्यवस्थित आणि भक्तांसाठी सोयीस्कर करण्याचा या मोहिमेचा उद्देश आहे.