लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी ई-केवायसी बंधनकारक आहे. ३१ डिसेंबरपर्यंत ते पूर्ण न केल्यास दरमहा मिळणारे दीड हजार रुपये बंद होणार आहे. केवायसीसाठी केवळ १४ दिवस शिल्लक असल्याने त्वरीत ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन महिला व बालविकास विभागाकडून करण्यात आले आहे. अपात्र लाभार्थ्यांना वगळण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची आहे. आता अंगणवाडीसेविका घरी जाऊन ई-केवायसी पूर्ण करण्यास मदत करणार आहेत, ज्यामुळे पात्र महिलांना योजनेचा लाभ मिळण्यास मदत होत आहे. आर्थिक परिस्थिती कमकुवत असलेल