शिरगाव परिसरातील पुसाणे गावात पवना नदीच्या कडेला बेकायदेशीररीत्या भट्टी लावून दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. ही कारवाई रविवारी (१८ जानेवारी) दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.पोलीस शिपाई प्रसाद जंगिलवाड यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी एका महिला आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.