परराज्यातून विनापरवाना व करचुकवेगिरी करत दारूची वाहतूक करणाऱ्या टोळीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाने पर्दाफाश केला आहे. पुणे विभागाच्या भरारी पथकाने केलेल्या कारवाईत ट्रकसह दारूसाठा जप्त करण्यात आला असून एकूण १४ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.