जालन्यात लोकशाही दिनात पाच अर्ज दाखल; 11 अर्जांवर घेण्यात आली सुनावणी... आज दिनांक 3 मंगळवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात हा लोकशाही दिनाचा कार्यक्रम पार पडला. या जिल्हास्तरीय लोकशाही दिनात एकूण पाच अर्ज प्राप्त झाले. या अर्जांवर उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी सुनावणी घेतली. अर्जांवर दिलेल्या सूचनेप्रमाणे संबंधित विभागांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.