आज दिनांक 22 डिसेंबर रोजी सोमवारला दुपारी तीन ते पाच वाजेच्या दरम्यान शहरातील गायत्री मंदिर येथील भव्य सभागृहात शताब्दी वर्ष निमित्त गोरेगांव खंडाची विस्तृत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकी मध्ये गृह संपर्क अभियान तथा हिंदू सम्मेलन या विषयावर विस्तृत चर्चा व नियोजन करण्यात आले. या बैठकीला श्रीकांत चौधरी, माजी सभापती मनोज बोपचे यासह गोरेगाव मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.