जालना:राष्ट्रीय प्रदुषण प्रतिबंध दिनानिमित्त आज दि. ०२ डिसेंबर रोजी जालना शहर मनपा, श्री शिवाजी हायस्कुल, जिल्हा परिषद प्रशाला तसेच इतर शाळांच्या सहकार्याने भव्य जनजागृती रॅली काढण्यांत आली. सदरील रॅली मा.पी.एम.मिन्नु मॅडम मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली मंमादेवी चौक पासुन सुरु झाली व गांधी चमन येथे संपन्न झाली. रॅली मध्ये विद्यार्थ्यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमुला. या रॅलीद्वारे प्रदुषण बाबत जनजागृती करण्यांत आली. यावेळी मा. पी एम मिनू मॅडम यांनी प्रदुषण टाळण्याचे जाहिर आवाहन केले. यावेळी अधिकारी वर्ग, कर्मचारी,शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.