ग्रामीण भारताचा आधारस्तंभ समजली जाणारी 'मनरेगा' योजना आता संकटात आहे का? असा संतप्त सवाल आज वर्ध्यातून उपस्थित करण्यात आला आहे. युपीए काळातील ऐतिहासिक 'काम करण्याचा अधिकार' देणारी ही योजना बंद करून केंद्र सरकारने आता 'VB-GRAM-G' ही नवीन योजना आणण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या भूमिकेविरोधात आज वर्ध्यात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत निदर्शने केली. असल्याचे आज 11 जानेवारी रोजी रात्री 9 वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहे